वाढदिवसानिमित्त

लेटरहेड वरील मजकूर 
दैनिक : पंचदीप वार्ता
मुख्य कार्यालय : प्रियदर्शनी समाज मंदिराजवळ, लातूर
ता. जि. लातूर – ४१३५१२
मो. ८१४९७१५४०९
दिनांक : ___ / ___ / २०२६

प्रति,
मा. चेअरमन साहेब,
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,
मुख्यालय, मेन रोड, लातूर.

विषय : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, तसेच महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद मा. आमदार अमितभैय्या विलासरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरात देणेबाबत.

महोदय,

     आपणांस विनम्र कळविण्यात येते की, दै. "पंचदीप वार्ता" या आपल्या वृत्तपत्रामार्फत समाजातील विविध घडामोडी, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण बातम्या सातत्याने प्रसिद्ध केल्या जातात.
मा. आमदार अमितभैय्या विलासरावजी देशमुख साहेब यांचा दि. २१ मार्च २०२६ रोजी
 वाढदिवसानिमित्त विशेष अंक प्रकाशित करण्यात येत आहे. या विशेषांकामध्ये त्यांच्या कार्याचा आढावा, सामाजिक योगदान व जनसंपर्क यांचा विशेष उल्लेख करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने, आपल्या प्रतिष्ठित बँकेकडून या विशेषांकासाठी जाहिरात देण्यात यावी, ही नम्र विनंती. आपल्या जाहिरातीमुळे या विशेषांकास अधिक बळकटी मिळेल तसेच आपल्या संस्थेचा जनसंपर्कही अधिक दृढ होईल, याची आम्हाला खात्री आहे.
जाहिरातीसंदर्भातील दरपत्रक व इतर आवश्यक माहिती आपणांस आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिली जाईल.
आपण सकारात्मक प्रतिसाद द्याल, ही अपेक्षा.
धन्यवाद.

आपला विश्वासू,

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर