जिल्हा परिषदेच्या नव्या नेतृत्वाकडून लातूरच्या विकासाला गती मिळणार!


1️⃣ लातूर जिल्हा परिषदेला नवे नेतृत्व जाहीर
2️⃣ अध्यक्षपदी भाजपच्या उषाताई संभाजी पाटील तळेगावकर यांची निवड
3️⃣ उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दयानंद सुरवसे विराजमान
4️⃣ नव्या नेतृत्वाकडून लातूरच्या विकासाला गती मिळणार

नमस्कार… नंदादीप वार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत.
लातूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवे नेतृत्व समोर आले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या सौ. उषाताई संभाजी पाटील तळेगावकर यांची निवड करण्यात आली आहे.
तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री. दयानंद सुरवसे यांची निवड झाली आहे.
दोन्ही पदांवर निवड झाल्यानंतर विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल आणि जिल्हा परिषदेमार्फत जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर