एड. असीम सरोदे यांचे लातूरमध्ये व्याख्यान



       लातूर, दि.२८ (प्रतिनिधी) : येथील  मुख्याध्यापक राजकुमार नामवाड गौरव समितीच्या वतीने जेष्ठ विधीज्ञ तथा राजकीय विश्लेषक आणि परिवर्तनवादी चळवळीतील  जेष्ठ कार्यकर्ते एडवोकेट असीम सरोदे यांचे " भारतीय संविधान  आणि सध्याचे राजकारण "या महत्वपूर्ण विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता  दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात होत असलेल्या व्याख्यानाचे अध्यक्षपद ज्येष्ठ अभ्यासक डॉ
 अशोक नारनवरे भूषविणार आहेत यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे, तसेच फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील विचारवंत प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी
या व्याख्यानाचा लातूरकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन राजकुमार गौरव समितीच्या वतीने मोहन हाके,
नरसिंग घोडके , शिरीष दिवेकर, प्रा.डॉ.सोमनाथ कदम,नारायण कांबळे, एकनाथ पलमटे, बालाजी साळुंखे,आप्पाराव शिंदे, उत्तम दोरवे, दयानंद कांबळे यांनी केले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर