नांदेड मध्ये पोलिसांची मोठी कारवाई

1️⃣ नांदेडमध्ये पोलीसांची मोठी कारवाई – जुगार अड्ड्यावर छापा
2️⃣ अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई, 30 लाखांचा हायवा जप्त
3️⃣ एकूण 32 लाखांचा मुद्देमाल जप्त, 5 आरोपी ताब्यात
4️⃣ 16 मार्चपासून गुटखा विरोधी विशेष मोहीम सुरू

नमस्कार… नंदादीप वार्ता न्यूज आपले स्वागत.
नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने हिमायतनगर आणि भोकर परिसरात छापे टाकत जुगार अड्डा आणि अवैध रेती वाहतुकीवर कारवाई केली.
हिमायतनगर परिसरात जुगार खेळणाऱ्यांवर छापा टाकत 27 हजार रुपये रोकड, चार मोबाईल आणि तीन मोटारसायकली असा एक लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान भोकर परिसरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवावर कारवाई करत भारत बेंज कंपनीचा सुमारे 30 लाख रुपयांचा हायवा आणि पाच ब्रास रेती जप्त करण्यात आली.
या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 32 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच 16 मार्च ते 30 मार्च दरम्यान नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत गुटखा विरोधी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली आहे.
अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी पोलीसांनी ‘खबर’ नावाची हेल्पलाईनही सुरू केली असून नागरिकांनी 9150100100 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर