अहिल्यानगर, ( प्रतिनिधी ) दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेला अहिल्यानगर मेळावा हा समाज बंधुभगिनींच्या ऐक्याचे आणि प्रबळ संघटनेचे दर्शन घडवणारा ठरला. या मेळाव्याने यशाच्या पायरीवर मोठे पाऊल टाकले असून, आता फक्त मानधन व प्रवासाच्या सोयीची अंमलबजावणी हा अंतिम टप्पा शिल्लक आहे. या मेळाव्याच्या यशामध्ये मा. ॲड. वैजनाथ वाघमारे यांच्या प्रामाणिक, पारदर्शक आणि जबरदस्त नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. समाजातील विविध स्तरांतील पुरस्कारार्थींनी एकत्र येऊन या मेळाव्याला ऐतिहासिक बनवले. पुरस्कारार्थींनी व्यक्त केले की, “आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सवलती देणाऱ्या हातात समाजसेवेचे आणि जनकल्याणाचे सामर्थ्य आहे. त्यांनी राजकारणापेक्षा सामाजिक सेवेला अधिक प्राधान्य दिले आहे, हे आम्हा सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवलं आहे.” मेळाव्यात उपस्थित वक्त्यांनी पुढे सांगितले की, “महामानवाच्या नावाने आम्हाला दिलेल्या पुरस्काराचा आम्हाला अभिमान आहे. या पुरस्कारामागे कोणताही भेदभाव नाही. ज्यांच्या नावाने आम्हाला सन्मान मिळाला, त...