गुटखा व मटका अड्ड्यावर छापे; 91 हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त

1️⃣ लातूरमध्ये पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची धडक कारवाई
2️⃣ गुटखा व मटका अड्ड्यावर छापे; 91 हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त
3️⃣ करीमनगरमध्ये 69 हजारांचा गुटखा जप्त; एक आरोपीवर गुन्हा
4️⃣ एमआयडीसी परिसरात मटका बुक्कीवर छापा; 13 जण ताब्यात
5️⃣ अवैध व्यवसायांची माहिती ‘खबर’ हेल्पलाईनवर देण्याचे आवाहन

लातूर शहरात अवैध व्यवसायांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने लातूरमध्ये छापेमारी करत गुटखा व मटका अड्ड्यावर धडक कारवाई केली.
विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करीमनगर येथे एका घरावर छापा टाकून 69 हजार 485 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी इम्रान इसाक पठाण या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आमलेश्वर नगर परिसरात मटका बुक्कीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत 11 हजार 620 रुपयांची रोकड आणि 10 हजार रुपयांचा मोबाईल असा 21 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 13 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 91 हजार 175 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती ‘खबर’ हेल्पलाईन 91 50 100 100 वर देण्याचे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर