मुरूड-अकोला चौकात सापळा रचून कारवाई. ₹30 हजार किमतीची पिस्टल व मॅगझीन जप्त. शस्त्र अधिनियम 3/25 अन्वये गुन्हा दाखल. संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याची शक्यता.
लातूर पोलिसांची पहाटे धडक कारवाई; गावठी पिस्टलसह तीन जण जेरबंद. मुरूड-अकोला चौकात सापळा रचून कारवाई. ₹30 हजार किमतीची पिस्टल व मॅगझीन जप्त. शस्त्र अधिनियम 3/25 अन्वये गुन्हा दाखल. संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याची शक्यता.
लातूर जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरुद्ध पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा आणि गातेगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने पहाटे मुरूड-अकोला चौक परिसरात सापळा रचून धडक कारवाई केली. या कारवाईत तीन संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले असून अजय गौतम लोमटे याच्याकडून स्टीलची गावठी पिस्टल आणि मॅगझीन असा सुमारे 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपीकडे शस्त्राचा कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले असून गातेगाव पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पार पडली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.