लातूर पोलिसांची सलग 21 तासांची अविरत धडक कारवाई – अवैध दारू व्यवसायावर मोठा प्रहार; ‘ऑल आऊट’ व ‘कोम्बिंग ऑपरेशन’द्वारे सराईत गुन्हेगारांवर नियंत्रण.*


*लातूर पोलिसांची सलग 21 तासांची अविरत धडक कारवाई – अवैध दारू व्यवसायावर मोठा प्रहार; ‘ऑल आऊट’ व ‘कोम्बिंग ऑपरेशन’द्वारे सराईत गुन्हेगारांवर नियंत्रण.*

       लातूर, दि.२९ (प्रतिनिधी) :    लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध व्यवसाय व गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 28 मार्च 2026 रोजी पहाटे 05.00 वाजल्यापासून ते दिनांक 29 मार्च 2026 रोजी मध्यरात्री 02.00 वाजेपर्यंत सलग व अविरत विशेष मोहीम राबविण्यात आली.
                या कालावधीत लातूर जिल्हा पोलीस दलाकडून एकाच वेळी विविध टप्प्यांमध्ये मास रेड (Mass Raid), ‘ऑल आऊट’ व ‘कोम्बिंग ऑपरेशन’ तसेच ‘ड्रंक अण्ड ड्राईव्ह’ विशेष मोहीम राबविण्यात आली. या एकत्रित व समन्वयित कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे व गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आघात करण्यात आला आहे.

*अवैध दारू व्यवसायावर मोठी कारवाई.*
            दिनांक 28 मार्च 2026 रोजी पहाटे आयोजित करण्यात आलेल्या मास रेड दरम्यान जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत, विशेषतः दुर्गम व आडवाटेच्या परिसरात लपून-छपून हातभट्टी दारू तयार करणारे तसेच देशी-विदेशी मद्याची अवैध विक्री करणाऱ्या इसमांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण  74 आरोपीताविरुद्ध एकूण 74 गुन्हे दाखल करण्यात आले असून, ₹4,19,342/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये हातभट्टी दारू, रसायन, भट्ट्या, ड्रम, प्लास्टिक कॅन तसेच देशी-विदेशी मद्याचा साठा यांचा समावेश आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर तयार स्थितीत असलेली हातभट्टी दारू व कच्चे रसायन घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.

*‘ऑल आऊट’ व ‘कोम्बिंग ऑपरेशन’द्वारे गुन्हेगारांवर कारवाई.*
             त्यानंतर दिनांक 28/06/2026 रोजी रात्री 23.00 वा. ते 29/06/2026 रोजी 02.00 वा. दरम्यान जिल्हाभर अचानक ‘ऑल आऊट’ व ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले. या ऑपरेशनमध्ये सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी स्वतः सहभाग घेत सुमारे 70 टक्के पोलीस अधिकारी व अंमलदारांना तैनात केले होते.
या कारवाईत 19 सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली असून, आर्म्स अक्ट कलम 3/25 व 4/25 अंतर्गत 8 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मालमत्तेविषयक गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

*ड्रंक अण्ड ड्राईव्ह विशेष मोहिमेत कारवाई.*
           याच दिवशी सायंकाळी 20.00 वा. ते 23.00 वा. दरम्यान ड्रंक अण्ड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 24 केसेस नोंदविण्यात आल्या असून, संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.तसेच संपूर्ण जिल्ह्यात 34 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. या नाकाबंदीकरिता 34 पोलीस अधिकारी व 149 पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली होती.
                 
                  या सर्व कारवाया अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने व समन्वय साधून पार पाडण्यात आल्या. सतत 21 तास चाललेल्या या अविरत कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली असून लातूर जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारी व अवैध धंद्यांविरुद्ध ‘अशा प्रकारच्या व्यापक, अचानक व प्रभावी कारवाया यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहेत.
                 नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे तसेच कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलीसांना कळवावी, असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात येत आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर