लातूर ग्रंथोत्सव 202614 व 15 मार्च
लातूर ग्रंथोत्सव 2026
14 व 15 मार्च
लातूर जिल्ह्यातील वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या वतीने “लातूर ग्रंथोत्सव 2026” चे आयोजन करण्यात आले आहे.
हा ग्रंथोत्सव 14 व 15 मार्च 2026 रोजी श्री मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, औसा येथे होणार आहे.
या ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन, पुस्तक विक्री तसेच विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उत्कृष्ट वाचकांचा सत्कार आणि मान्यवरांची उपस्थितीही लाभणार आहे.
ग्रंथप्रेमी आणि नागरिकांसाठी सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत ग्रंथ प्रदर्शन खुले राहणार असून, प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे.
तरी सर्व ग्रंथप्रेमींनी या ग्रंथोत्सवाला उपस्थित राहून वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.