लातूर महापालिकेचा 2026-27 चा अंदाजपत्रक जाहीर
लातूर महापालिकेचा 2026-27 चा अंदाजपत्रक जाहीर
₹919.82 कोटींचे उत्पन्न, ₹919.47 कोटींचा खर्च अपेक्षित
महसुली व भांडवली खर्चावर भर; ₹35.65 लाख शिल्लक अपेक्षित
लातूर, दि.३० (प्रतिनिधी) :
लातूर शहर महानगरपालिकेने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक जाहीर केले असून एकूण ₹919.82 कोटींचे उत्पन्न आणि ₹919.47 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न, विविध शासकीय योजना, कर्ज व निधी तसेच केंद्र शासनाच्या अनुदानाचा समावेश करण्यात आला आहे.
महसुली उत्पन्नातून सुमारे ₹250.90 कोटी तर भांडवली जमा ₹41.09 कोटी अपेक्षित आहेत. तसेच केंद्र शासनाच्या अनुदानातून ₹134.58 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
खर्चाच्या बाबतीत महसुली खर्चासाठी ₹271.73 कोटी, भांडवली खर्चासाठी ₹186.37 कोटी आणि केंद्र शासन अनुदानातून ₹262.79 कोटी खर्च अपेक्षित आहे.
या अंदाजपत्रकातून शहराच्या विकासकामांना चालना मिळण्याची अपेक्षा असून आर्थिक वर्षाच्या अखेरीस सुमारे ₹35.65 लाख शिल्लक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.