1️⃣ शेतकऱ्यांच्या हितासाठी लातूर पोलिसांची तत्पर कारवाई
2️⃣ पाणबुडी मोटार वायर चोरीचा गुन्हा उघड; आरोपी जेरबंद
3️⃣ २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
4️⃣ चोरीच्या मोटारसायकलींसह मोबाईल फोन पोलिसांच्या ताब्यात
5️⃣ लातूर कारवाईत पुण्यातील हडपसरमधील चोरीचाही उलगडा.

लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी पोलिसांनी मोठी कारवाई करत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. उदगीर तालुक्यातील कौळखेड परिसरात शेतातील पाणबुडी मोटार वायर चोरीच्या प्रकरणाचा उदगीर ग्रामीण पोलिसांनी अल्पावधीत तपास लावला आहे.
गोरख चव्हाण यांच्या शेतातील पाणबुडी मोटारीस जोडलेले अंदाजे १०० फूट वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे हेर गाव परिसरात सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिली.
या कारवाईत पाणबुडी मोटारचे वायर, चार मोटारसायकली आणि सहा मोबाईल फोन असा एकूण दोन लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जप्त केलेल्या मोटारसायकलींपैकी काही वाहनांचा संबंध पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याशी असल्याचेही तपासात समोर आले आहे.
लातूर जिल्हा पोलीस शेतकरी बांधवांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असून अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर