लातूर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी मृत्यू प्रकरण तापले!
निष्पक्ष SIT चौकशीची मागणी; आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येवून निवेदन देण्यात आले.
लातूर शहरातील नवोदय विद्यालयात घडलेल्या विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
ही आत्महत्या नसून थेट खून असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
प्रशासनाने आत्महत्येचा बनावट निष्कर्ष काढत पुरावे नष्ट केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी आज लातूर शहरात तीव्र आंदोलन छेडण्यात आले.
माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, तसेच नवोदय विद्यालयाच्या अध्यक्षांसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून मोबाईल CDR आणि लोकेशन तपासावे,
अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे.
SIT प्रमुख तपास अधिकाऱ्यांवरही संशय व्यक्त करत त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पीडित मुलीच्या आई-वडिलांचे जबाब नोंदवून FIR मध्ये आवश्यक बदल करावेत,
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी,
आणि दोषींना फाशीची शिक्षा द्यावी,
अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
या प्रकरणाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून,
सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर