लातूर पोलीसांकडून सलग दुसऱ्या दिवशी अवैध धंद्यांवर धडक कारवाई.–मटका जुगार व दारूबंदी प्रकरणात एकूण २४ आरोपींवर कारवाई ₹३,०७,७०५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
लातूर पोलीस दलाने सलग दुसऱ्या दिवशी व्यापक, नियोजनबद्ध व परिणामकारक कारवाई करत विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध जुगार,तसेच दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात एकाच वेळी छापे टाकून मोठ्या प्रमाणात आरोपींना अटक करण्यात आली असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
*१) पोलीस स्टेशन गांधी चौक.*
पोलीस स्टेशन गांधी चौक हद्दीत मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड यांचे विशेष पथक व लातूर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून गोजम गुंडे कॉम्प्लेक्स जवळ लातूर येथे अवैध धंद्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये आरोपी
1)विजय उद्धव लांडगे
2)गोविंद चंद्रसेन खाडप
3)नितीन गायकवाड
4)मुजाहिद बोरगावकर
5)सतार देशमुख
6)बळीराम थोरात
इतर आठ इसम याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून ₹ 1,75,100/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याशिवाय दारूबंदी अंतर्गत
1) दत्ता वसंत गिरी, वय 44 वर्ष, रा. म्हाडा कॉलनी, लातूर याचेवर कारवाई करण्यात आली आहे.
*२) पोलीस स्टेशन उदगीर शहर.*
उदगीर शहर पोलीस स्टेशन हद्दीत राज शॉप जवळ, उदगीर येथे अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली. असून त्यामध्ये
1)भीमसिंह राजपालसिंग ठाकूर, वय 49 वर्ष, रा. किल्ला गल्ली, उदगीर
2)बालाजी सोपानराव परगे, रा. उदगीर एकूण आरोपी संख्या 2 इतके असून त्यांच्याकडून ₹ 1,32,605/-जप्त करण्यात आला आहे.
*३) पोलीस स्टेशन किनगाव.*
पोलीस स्टेशन किनगाव हद्दीत अवैध जुगार धंद्यावर छापा टाकून
1)प्रेमनाथ मुरलीधर भतानी, वय 44 वर्ष, रा. रायवाडी
2)अर्जुन श्रीहरी मुरकुटे, वय 40 वर्ष
3)दीपक दत्तात्रय जाधव, वय 27 वर्ष
4)ऋतिक संजय वेडे, वय 20 वर्ष, रा. करेपूर ता. रेणापूर असे आहे.
दारूबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करत खालील पोलीस स्टेशन अंतर्गत स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या असून यामध्ये
*(१) पोलीस स्टेशन औसा*
आरोपी : चिनूमिया मुनवर सय्यद, वय 56 वर्ष, रा. तुंगी, ता. औसा
*(२) पोलीस स्टेशन अहमदपूर.*
आरोपी : राजमा मलया कलाल, वय 70 वर्ष, रा. शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर.
*(३) पोलीस स्टेशन निलंगा.*
आरोपी : उत्तम गोरोबा शिंदे, वय 75 वर्ष, रा. लांबोटा, ता. निलंगा
असे असून नमूद गुन्ह्यात एकूण 24 आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली असून 3,07,705/- (रु. तीन लाख सात हजार सातशे पाच) रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध जुगार, सट्टा, बेकायदेशीर मद्यविक्री किंवा समाजविघातक कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत. अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर, सातत्यपूर्ण व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा लातूर पोलीस दलामार्फत देण्यात आला आहे. नागरिकांनी अवैध धंद्यांबाबत माहिती असल्यास तात्काळ पोलीस प्रशासनास कळवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.