मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिकअसताना लातूरमध्येच उद्योगावर आयकर विभागाची धाड का? सोयाबीन बाजारात खळबळ, शेतकरी–ग्राहक दोघेही अडचणीत आले आहेत.लातूरमधील एका प्रमुख खाद्यतेल उद्योगावर आयकर विभागाने धाड टाकल्यानंतर उद्योगाचे व्यवहार तात्पुरते ठप्प झाले आहेत. याचा थेट फटका सोयाबीन बाजाराला बसत असून, दरांमध्ये ५ ते १० टक्क्यांची घसरण नोंदवली जात आहे. लातूर येथील डालडा फॅक्टरी बंद करून अन्याय केला होता, पण आता पुन्हा एकदा उद्योग क्षेत्रावर धाडी टाकून राज्य सरकार काय साध्य करणार आहे, हे अंधातरीत आहे. बाजारातील खरेदी बंद झाल्याने सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांनी घसरल्याची माहिती व्यापारी आणि शेतकरी संघटनांकडून मिळत आहे.ही परिस्थिती केवळ लातूरपुरती मर्यादित न राहता सोलापूरसह संपूर्ण मराठवाड्यात पसरली आहे. बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड आदी बाजारांमध्येही अस्थिरता निर्माण झाली असून, मोठा खरेदीदार बाजारातून बाहेर पडल्याने व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे.एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत असताना, दुसरीकडे खाद्यतेलाच्या दरात मात्र वाढ होताना दिसत आहे. कच्चा माल पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने तेलाच्या डब्याच्या किमतीत १०० ते १५० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे.यामुळे सर्वसामान्यांचे घरगुती बजेट कोलमडले असून, शेतकरी आणि ग्राहक दोघेही संकटात सापडले आहेत.या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, सोयाबीन खरेदीसाठी पर्यायी यंत्रणा उभी करावी आणि खाद्यतेलाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक नियुक्त करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.कायदेशीर तपास सुरू असताना उद्योग, शेतकरी आणि ग्राहकांचे हित जपले जावे, अशी अपेक्षा आता सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.


मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक
असताना लातूरमध्येच उद्योगावर आयकर विभागाची धाड का? सोयाबीन बाजारात खळबळ, शेतकरी–ग्राहक दोघेही अडचणीत आले आहेत.
लातूरमधील एका प्रमुख खाद्यतेल उद्योगावर आयकर विभागाने धाड टाकल्यानंतर उद्योगाचे व्यवहार तात्पुरते ठप्प झाले आहेत. याचा थेट फटका सोयाबीन बाजाराला बसत असून, दरांमध्ये ५ ते १० टक्क्यांची घसरण नोंदवली जात आहे. लातूर येथील डालडा फॅक्टरी बंद करून अन्याय केला होता, पण आता पुन्हा एकदा उद्योग क्षेत्रावर धाडी टाकून राज्य सरकार काय साध्य करणार आहे, हे अंधातरीत आहे. बाजारातील खरेदी बंद झाल्याने सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांनी घसरल्याची माहिती व्यापारी आणि शेतकरी संघटनांकडून मिळत आहे.
ही परिस्थिती केवळ लातूरपुरती मर्यादित न राहता सोलापूरसह संपूर्ण मराठवाड्यात पसरली आहे. बीड, धाराशिव, परभणी, नांदेड आदी बाजारांमध्येही अस्थिरता निर्माण झाली असून, मोठा खरेदीदार बाजारातून बाहेर पडल्याने व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे.
एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत असताना, दुसरीकडे खाद्यतेलाच्या दरात मात्र वाढ होताना दिसत आहे. कच्चा माल पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने तेलाच्या डब्याच्या किमतीत १०० ते १५० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे.
यामुळे सर्वसामान्यांचे घरगुती बजेट कोलमडले असून, शेतकरी आणि ग्राहक दोघेही संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, सोयाबीन खरेदीसाठी पर्यायी यंत्रणा उभी करावी आणि खाद्यतेलाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक नियुक्त करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
कायदेशीर तपास सुरू असताना उद्योग, शेतकरी आणि ग्राहकांचे हित जपले जावे, अशी अपेक्षा आता सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर