सामाजिक न्याय पुरस्कारार्थींच्या मानधनवाढीसाठी आणि मोफत बस प्रवासासाठी लातूर ग्रामीणचे आमदार रमेशअप्पा कराड यांना निवेदन

सामाजिक न्याय पुरस्कारार्थींच्या मानधनवाढीसाठी आणि मोफत बस प्रवासासाठी लातूर ग्रामीणचे आमदार रमेशअप्पा कराड यांना निवेदन देण्यात आले.
     लातूर, दि.१८ (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय सन्मानित ‘समाजभूषण पुरस्कारार्थी’ यांचे मानधन वाढवून देण्यात यावे, तसेच परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सर्व बसेसमधून त्यांना विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश (अप्पा) कराड यांच्याकडे करण्यात आली आहे.
या मागणीसाठी विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात यावा, यासंदर्भात शेषेराव करखेलीकर आणि तुकाराम पाटील देवणीकर यांनी आमदारांना निवेदन सादर केले. यावेळी आरक्षण समर्थक आघाडीचे राजेंद्र वनारसे उपस्थित होते.
सामाजिक न्यायासाठी कार्य करणाऱ्या समाजभूषण पुरस्कारार्थींना सन्मानजनक सुविधा मिळाव्यात, यासाठी हा मुद्दा विधिमंडळात मांडण्याची मागणी करण्यात आली आहे.
बुधवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी हे निवेदन देण्यात आले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर