लातूरमध्ये अवैध शस्त्र व जुगार व्यवसायावर पोलिसांची मोठी कारवाई; ७ आरोपी अटक, ५.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूरमध्ये अवैध शस्त्र व जुगार व्यवसायावर पोलिसांची मोठी कारवाई; ७ आरोपी अटक, ५.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी अवैध शस्त्र आणि बेकायदेशीर जुगार व्यवसायाविरोधात जोरदार कारवाई केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी सलग धडक कारवाया करत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलिसांनी लोखंडी तलवारी, रोख रक्कम, जुगार साहित्य, मोबाईल फोन आणि वाहने असा ५ लाख ८३ हजार ६०० रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नवीन आणि जुना रेणापुर नाका परिसरात दोन वेगवेगळ्या कारवायांत विनापरवाना तलवार बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली.
तर बाभळगाव रोडवरील म्हाडा कॉलनी परिसरात “तिर्रट” जुगारावर छापा टाकून पाच जणांना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही संपूर्ण कारवाई अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि लातूर जिल्हा पोलीस दल यांच्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली.
पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,
अवैध शस्त्र बाळगणे आणि जुगार व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.
नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
लातूर पोलिसांचा गुन्हेगारांविरोधातील हा धडाका पुढेही सुरूच राहणार आहे.