औसा रोडवर विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; एकाचा मृत्यू, एक आरोपी ताब्यात

औसा रोडवर विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; एकाचा मृत्यू, एक आरोपी ताब्यात

शहरात पुन्हा एकदा विद्यार्थी भांडण रक्तरंजित झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सोमवारी रात्री आठच्या सुमारास लातूरमधील औसा रोड परिसरात विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या जोरदार भांडणात एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला.
भांडण इतके टोकाला गेले की रस्त्यावरच रक्ताचे थारोळे साचले. जखमी अवस्थेत तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एकाला ताब्यात घेतले असून इतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
या घटनेमुळे औसा रोड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लातूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर