लातूरमध्ये ‘राष्ट्रीय लोकशांतता न्यास’ची जिल्हा बैठक २४ फेब्रुवारीला
लातूरमध्ये ‘राष्ट्रीय लोकशांतता न्यास’ची जिद्द बैठक २४ फेब्रुवारीला
लातूर : पद्मभूषण मा. अण्णा साहेब हजारें प्रेरित राष्ट्रीय लोकशांतता न्यास यांच्या वतीने संघटन बांधणी, निकोप लोकशाही, लोकशिक्षण जागृती व सभासद नोंदणी या उद्देशाने ‘जिल्हा अबैठक’चे आयोजन करण्यात आले आहे.
ही बैठक मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता भालचंद्र ब्लड बँक, लातूर येथे पार पडणार आहे. बैठकीचे अध्यक्षस्थान कार्याध्यक्ष श्रीमती कल्पनाताई ईनामदार भूषविणार आहेत.
युवक, युवती, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी व शेतमजूर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभासद नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमात तालुकाध्यक्ष असलम शेख, जिल्हाध्यक्ष प्रा. बाबासाहेब नंदवे, जिल्हा सचिव रामेश्वर बाबुराव सूर्यवंशी तसेच शहर जिल्हाध्यक्ष सचिन अंकुशे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अधिक माहितीसाठी ८४११९३९३६४ व ७८८८१०५९०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.