महा पशुधन एक्स्पो २०२६ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १४ फेब्रुवारीला भेट देणार



बीड :- पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या महा पशुधन एक्स्पो २०२६ अंतर्गत आयोजित प्रदर्शन स्थळास राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस शनिवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शनास भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधणार आहेत.

*13 फेब्रुवारी ला होणार सुरुवात*

दरम्यान, या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पार पडणार आहे. राज्याच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री मा.  पंकजताई मुंडे यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक शेती व पशुपालन तंत्रज्ञानाची माहिती मिळणार असून, बीड जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी व पशुपालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर