सुधारित...

लातूरमध्ये न्यायासाठी समाजाचा सोमवारी आक्रोश महामोर्चा; अनुष्का पाटोळे हत्या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी

लातूर प्रतिनिधी : शहरातील नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळेच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा, या मागणीसाठी समाजाचा भव्य आक्रोश महामोर्चा आयोजित करण्यात येत आहे. या संदर्भात सकल मातंग समाजाच्या वतीने पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता हा महामोर्चा काढण्यात येणार असून समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

हा मोर्चा साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा परिसर येथून सुरू होऊन जिल्हा परिषद कार्यालय, शिवाजी महाराज चौक ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे समाप्त होणार आहे. या मोर्चात माजी गृहमंञी तथा मंत्री महाराष्ट्र राज्य रमेश बागवे,  लहुजी शक्ती सेना प्रदेशाध्यक्ष विष्णू कसबे, माजी आमदार सुधाकर भालेराव, राम गुंडिले, डिपीआयचे अंजिक्य चादणे, नागिनीताई कांबळे, रामचंद्र भराडे, सचिन साठे, मच्छिंद्र सकटे, राजाभाऊ जयवंत आवळे, दीपक केदार, महेश डोलारे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. 

या मोर्च्याद्वारे पुढील प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत : माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली निष्पक्ष चौकशी समिती स्थापन करावी, सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून तात्काळ न्याय मिळवून द्यावा, हे प्रकरण आत्महत्या नसून खुनाचे असल्याने सर्व आरोपींवर कठोर कारवाईच्या दृष्टीने तपास करावा, नवोदय विद्यालय आस्थापनेचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांना सहआरोपी करण्यात यावे व आरोपींची नार्को टेस्ट करावी. अध्यक्षांच्या मोबाईलचा सीडीआर तपासावा तसेच सर्व आरोपींचे तत्कालीन लोकेशन तपासात घ्यावे, एसआयटीच्या प्रमुख तपास अधिकाऱ्यांच्या तपासाबाबत शंका असल्याने तात्काळ अधिकारी बदलावा, मृत मुलीच्या आई-वडिलांचा पुरवणी जबाब घेऊन तपास अहवालात आरोपींची संख्या व नावे निश्चित करून एफआयआरमध्ये आवश्यक बदल करावेत, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, सदर प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागण्यांसाठी समाज एकत्र येत असून, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवला जाईल, असा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर