सिध्देश्वर–येणेगुरे शाळेच्या स्नेहसंमेलनात कु. अंजली पांढरे यांचा ‘आदर्श अष्टपैलू विद्यार्थी’ म्हणून गौरव


       लातूर, दि. ४(प्रतिनिधी):  शहरातील गावभाग परिसरातील खडक हनुमान चौक येथील टीचर्स एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सिध्देश्वर प्राथमिक शाळा व श्री येणेगुरे हायस्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सन २०१६ ते २०२६ या कालावधीत पहिलीपासून दहावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी कु. अंजली पांढरे हिचा ‘आदर्श विद्यार्थी – अष्टपैलू सिध्देश्वर–येणेगुरे विद्यार्थी गौरव सन्मान’ देऊन सन्मान करण्यात आला.
हा सन्मान टीचर्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. मधुकरराव आवसकर तसेच प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सिध्देश्वर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. अच्युतराव सोनवणे, श्री येणेगुरे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. शिवाजीराव कराड यांच्यासह शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कु. अंजली पांढरे हिने शालेय शिक्षणाच्या दहा वर्षांतील आपले अनुभव, शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळेने दिलेले संस्कार व संधी याबाबत मनोगत व्यक्त केले. तिच्या या भावनिक व प्रेरणादायी अनुभव कथनाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांनी कु. अंजली पांढरे हिच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सर्वांगीण प्रगतीचे कौतुक करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नं

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर