लातूरात शेतकरी रडतोय, ग्राहक लुटला जातोय… आणि महाराष्ट्र राज्य सरकार मात्र गप्प!
लातूरात शेतकरी रडतोय, ग्राहक लुटला जातोय… आणि महाराष्ट्र राज्य सरकार मात्र गप्प!
लातूरमधील खाद्यतेल उद्योगावर आयकर धाडीनंतर संपूर्ण मराठवाड्यात सोयाबीन बाजार कोसळला आहे.
दर प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांनी घसरले… शेतकरी आर्थिक संकटात सापडला…
पण राज्य सरकार कुठे आहे?
एकीकडे सोयाबीनला भाव नाही, खरेदी ठप्प…
दुसरीकडे खाद्यतेलाचे डबे मात्र १०० ते १५० रुपयांनी महाग!
हा विरोधाभास नाही, ही थेट अपयशी धोरणांची पावती आहे!
मोठा उद्योग बंद पडतो, संपूर्ण बाजार हादरतो,
आणि सरकारकडे ना पर्यायी खरेदी व्यवस्था…
ना दर नियंत्रण…
ना शेतकऱ्यांना आधार!
प्रश्न थेट आहेत—
उद्योग बंद राहिल्याची जबाबदारी कोणाची?
शेतकऱ्यांचे नुकसान कोण भरून काढणार?
ग्राहकांची लूट थांबवणार कोण?
तपास व्हावा, पण शेतकरी उद्ध्वस्त करून नव्हे!
आज हस्तक्षेप नाही, तर उद्या मराठवाड्याचा शेतकरी रस्त्यावर उतरेल…
आणि त्याची जबाबदारी थेट राज्य सरकारवर असेल!