लातूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता; अभिनंदनासोबतच ‘पुढे काय?’ असा सवाल
लातूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता;
अभिनंदनासोबतच ‘पुढे काय?’ असा सवाल
लातूर : लातूर महानगरपालिकेत अखेर काँग्रेसची सत्ता स्थापन झाली असून महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असले तरी, या राजकीय घडामोडीनंतर “पुढे काय होणार?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे पाहता “गरज सरो, वैद्य मरो” अशी अवस्था निर्माण झाल्याची चर्चा जनतेत होत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला बाजूला सारून काँग्रेस पक्षाने एकहाती ताकदीने निवडणूक लढवली. मात्र या भूमिकेतून नेमके काय साध्य झाले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जर त्या वेळी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले असते, तर आज लातूर जिल्हा परिषदेत कांग्रेसची सत्ता आली असती.
कांग्रेसला ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता तरी वंचित बहुजन आघाडीने पुढील राजकीय वाटचालीबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सत्ता स्थापन केली जाणार आहे. यावर काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. कारण राज्यात सध्या महायुतीचे सरकार असून, लातूर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत जनतेने दिलेल्या कौलानुसार काँग्रेसला २३, भाजपला १८, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १२, शिवसेना १, मनसे १ तर अपक्षांना २ जागा मिळाल्या आहेत. हा निकाल पाहता, आगामी काळात जिल्ह्यातील राजकारण अधिक रंगतदार होणार असून, प्रत्येक पक्षाची पुढील भूमिका निर्णायक ठरणार आहे.