जनता पार्टी लातूर


भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे मराठवाड्याला पक्ष संघटनेत मोठे स्थान मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्चनाताईंना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी यशस्वी कारकिर्दीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर या पक्षातील सक्रिय आणि अभ्यासू नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या नेतृत्वामुळे महिला सक्षमीकरणासोबतच पक्ष संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ही निवड केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची निवड झाल्याबद्दल चंद्रकांत वाघमारे व मच्छिंद्र कलवले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर