लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या
पोलीस शिपाई भरती २०२४–२५ अंतर्गत
शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेला
आज दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी
सकाळी ८ वाजल्यापासून
पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे सुरुवात झाली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी
एकूण ८४९ पुरुष उमेदवारांना बोलाविण्यात आले होते.
यापैकी ८४८ उमेदवार उपस्थित राहिले
तर १ उमेदवार गैरहजर राहिला आहे.
शारीरिक मोजमाप प्रक्रियेनंतर
७४७ उमेदवार अपात्र ठरले असून
उर्वरित १०२ उमेदवार
१६०० / ८०० मीटर धावणे व गोळा फेक
या मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले आहेत.
मैदानी चाचणीत मिळालेल्या गुणांची यादी
पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर
तसेच पोलीस मुख्यालयात दर्शनी भागावर
आणि www.laturpolice.gov.in या संकेतस्थळावर
प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गुणयादीबाबत आक्षेप असल्यास
उमेदवारांनी ४८ तासांच्या आत
ई-मेलद्वारे लेखी स्वरूपात नोंदवावे,
असे पोलीस प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर