लातूरमध्ये अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा
लातूरमध्ये अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा, रस्त्यांवर पाणी साचले. आज सायंकाळी सुमारे ६.१५ ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान शहरात अचानक जोरदार पाऊस कोसळला. अवघ्या पंधरा मिनिटांच्या मुसळधार सरींमुळे शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पावसामुळे काही भागांत वाहतुकीचा वेग मंदावला, तर नागरिकांची धावपळ उडाली. कार्यालयातून घरी परतणाऱ्या नागरिकांना अचानक आलेल्या पावसामुळे अडचणींचा सामना करावा लागला.
हवामान खात्याने यापूर्वी दिलेल्या इशाऱ्यानुसार मराठवाड्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पुढील काही तासांत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.