निलंगा येथे २४ फेब्रुवारीला पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
निलंगा येथे २४ फेब्रुवारीला पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी
लातूर, दि. २२ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि निलंगा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता निलंगा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे पार पडणार आहे. या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित आस्थापना आणि उद्योजक सहभागी होणार असून, त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मेळाव्यात दहावी, बारावी, कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, आय.टी.आय., डिप्लोमा तसेच इतर कोणत्याही शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार सहभागी होऊ शकतात. विविध क्षेत्रांतील पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता निलंगा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. मुलाखतीसाठी शैक्षणिक प्रमाणपत्रे, स्वतःचा रिझ्युमे, बायोडाटा, पासपोर्ट आकाराचे फोटो (किमान पाच प्रती) इत्यादी सोबत आणावेत, असे आवाहन लातूर येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.