पालकमंत्र्यांचा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढाव ागुन्हेगारांची गय नाही; अवैध दारू व अंमली पदार्थांवर कडक कारवाईचे आदेश
पालकमंत्र्यांचा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
गुन्हेगारांची गय नाही; अवैध दारू व अंमली पदार्थांवर कडक कारवाईचे आदेश
लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज कठोर भूमिका घेतली. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही.
शहरातील ट्युशन एरिया, शाळा आणि महाविद्यालय परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. अवैध दारू विक्री रोखण्यासाठी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त मोहीम राबवावी, तसेच अंमली पदार्थ व नशेच्या औषधांवर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले.
ज्या भागात अवैध धंदे सुरू आढळतील, त्या क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.
बैठकीस बाबासाहेब पाटील, डॉ. शिवाजी काळगे, संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे उपस्थित होते.
जिल्ह्यात एमपीडीए अंतर्गत कारवाई वेगाने सुरू असून विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी विशेष मोहीमही राबवली जाणार आहे.