लातूर मधील महत्वाची बातमी..
लातूर मधील एक धक्कादायक पण तितकीच महत्वाची बातमी… ६ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यामागे बनावट चोरीचा बनाव असल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणात जावेद जलील शेख आणि आकाश प्रकाश ढगे या दोघांना अटक करण्यात आली आहे. जावेद हा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एक्स-रे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होता. सेंटरची बँकेत जमा करण्यासाठी दिलेली ६ लाख रुपयांची रक्कम स्कूटरच्या डिक्कीतून चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली होती.
मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या सखोल तपासात बनावट चावी तयार करून संगनमताने चोरीचा बनाव रचल्याचे उघड झाले. आरोपींकडून ५ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून ५० हजार रुपये खर्च केल्याची कबुली देण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करीत आहे.
अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.