अनुष्का पाटोळे हत्या प्रकरणी न्यायासाठी लातूरमध्ये सकल मातंग समाजाचा आज महामोर्चाचे आयोजन

अनुष्का पाटोळे हत्या प्रकरणी न्यायासाठी लातूरमध्ये सकल मातंग समाजाचा आज महामोर्चाचे आयोजन 
         लातूर, दि. १५ (प्रतिनिधी) :  या बालिकेच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि तिला तात्काळ न्याय मिळावा, यासाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल मातंग समाजाच्या वतीने भव्य महापोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महापोर्चा दिनांक १६ फेब्रुवारी २०२६, रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला असून समाजातील सर्व बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येनेकु. अनुष्का पाटोळे उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
प्रसिद्धी पत्रकानुसार, कु. अनुष्का पाटोळे हिच्या मृत्यूबाबत आत्महत्येचा बनाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असून, ही हत्या असल्याचा ठाम संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात काही आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद तपासणी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी समाजाची ठाम मागणी आहे.
महापोर्चामध्ये लातूर येथील विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी तसेच समाजातील विविध घटक सहभागी होणार आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ठोस पावले उचलली जावीत, असा संदेश प्रशासनाला देण्यात येणार आहे.
मुख्य मागण्या :
अनुष्का पाटोळे हत्या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावी.
हे प्रकरण आत्महत्या नसून खून असल्याच्या दृष्टीने तपास करण्यात यावा.
लातूरच्या नवोदय विद्यालयाचे अध्यक्ष व प्राचार्य यांची सखोल चौकशी करावी.
नवोदय विद्यालयातील सर्व CCTV कॅमेरे जप्त करून त्यांची बारकाईने तपासणी करावी.
सदर प्रकरण एसआयटी/सीबीआयकडे वर्ग करावे तसेच सर्व आरोपींची नार्को टेस्ट करावी.
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.
हा महापोर्चा सकल मातंग समाज, लातूर जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी न्यायासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर