पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस भरती दिनांक ११.०२.२०२६ रोजीपासून पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे पोलिस शिपाई (३०), चालक पोलिस शिपाई (१६) "शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी" होणार आहे.
पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस भरती दिनांक ११.०२.२०२६ रोजीपासून पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे पोलिस शिपाई (३०), चालक पोलिस शिपाई (१६) "शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी" होणार आहे.
लातूर जिल्हा पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई भरती २०२४-२०२५ लातूर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची (३०), व चालक पोलीस शिपाई यांची (१६) अशा एकुण (४६) पदाची भरती २०२४-२०२५ करिता दिनांक २९.१०.२०२५ रोजी स्थानिक वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच लातूर जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळ www.laturpolice.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने महाआयटी यांचे मार्फत पोलीस भरती सन २०२४-२०२५ चे अनुषंगाने दिनांक २९.१०.२०२५ ते दिनांक ०७.१२.२०२५ या कालावधीमध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज भरावयाची सुविधा http:/ policerecruitment2025.mahait.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती.
दिनांक २९.१०.२०२५ रोजी स्थानिक वर्तमानपत्रात तसेच लातूर जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नमुद प्रमाणे प्रवर्गनिहाय पोलीस शिपाई यांची (३०) पदे भरण्यासाठी (१६९२) पुरूष व (३२०) महिला अशा एकुण (२०१२) उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केलेले आहेत.
तसेच चालक पोलीस शिपाई यांची (१६) पदे भरण्यासाठी (३८३९) पुरूष व (४३७) महिला अशा एकुण (४२७६) उमेदवारांनी लातूर जिल्हा पोलीस भरतीकरिता आवेदन अर्ज सादर केलेले आहेत.
लातूर जिल्हा पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती २०२४-२०२५ ची जाहिरातीमध्ये नमुद प्रमाणे प्रवर्गनिहाय एकुण (४६) रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेची " शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी " ही दिनांक ११.०२.२०२६ रोजी सकाळी ०५.०० वाजता पासून पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे होणार आहे. संबंधीत उमेदवारांना महाआयटी यांचेकडुन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सदर प्रवेशपत्रावर उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेतील शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीस कोणत्या तारखेस हजर रहावयाचे आहे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना प्रवेशपत्रावर देण्यात आलेल्या तारखेस पोलीस मुख्यालय, बाभळगाव लातूर येथे पोलीस भरती प्रक्रियेसाठी हजर रहायचे आहे. उमेदवार दिलेल्या तारखेस पोलीस भरतीच्या शारिरीक चाचणीस उपस्थित न राहिल्यास त्यांना नंतर संधी देण्यात येणार नाही. परंतु अपरिहार्य कारणामुळे किंवा तांत्रिक अडचणी मुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होवू शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाणार आहे.
उमेदवारांनी " शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी " करिता सोबत आणावयाचे साहित्य, कागदपत्राची माहिती तसेच सुचना याबाबतची सविस्तर माहिती या कार्यालयाचे संकेतस्थळ www.laturpolice.gov.in वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.