लातूर पोलीस दलाच्या विशेष पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत डारमंड फाईलमधील तब्बल १७ वर्षांपूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद केले आहे.

लातूर पोलीस दलाच्या विशेष पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत डारमंड फाईलमधील तब्बल १७ वर्षांपूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद केले आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक १३३/२००९ अंतर्गत मोटारसायकल चोरीप्रकरणी आरोपी सिध्देश्वर ऊर्फ दत्ता शिवाजी घोगरे हा गेल्या १७ वर्षांपासून फरार होता.
न्यायालयीन प्रक्रियेला चुकवण्यासाठी आरोपीने वारंवार वास्तव्य बदलून प्रशासनाला गुंगारा दिला होता.
मात्र अलीकडे आरोपी लातूर शहरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सापळा रचत सिध्देश्वर चौक परिसरातून आरोपीस अटक केली.
आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले असून मा. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यास १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
डारमंड फाईलमधील जुने व प्रलंबित गुन्हे उघड करून फरार आरोपींना अटक करण्याची लातूर पोलीसांची मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर