लातूर महानगरपालिकेत काँग्रेसचा झेंडा; महापौर-उपमहापौर बिनविरोध निवड
लातूर महानगरपालिकेत काँग्रेसचा झेंडा; महापौर-उपमहापौर बिनविरोध निवड
लातूर : लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री भालचंद्र सोनकांबळे यांची, तर उपमहापौरपदी ॲड. स्नेहल उटगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक एकतर्फी झाली.
या निवडीमुळे महानगरपालिकेत काँग्रेसचे वर्चस्व अधोरेखित झाले असून शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे राजकीय व सामाजिक स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.