स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. धामनगाव येथील घरफोडी प्रकरणाचा छडा. दोन सराईत चोरटे अटक, ₹ ८०,०००/- किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत


*स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. धामनगाव येथील घरफोडी प्रकरणाचा छडा. दोन सराईत चोरटे अटक, ₹ ८०,०००/- किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत.*

                    जळकोट पोलीस स्टेशन हद्दीतील धामनगाव, ता. जळकोट येथे रात्रीच्या वेळी घरफोडी करून चोरी केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गु.र.नं. १८/२०२६, कलम ३३३(३), ३०५(अ) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्ह्यातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून जेरबंद करून मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
                   पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात दिनांक ०७/०२/२०२६ रोजी पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून दोन इसम ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे पिवळसर रंगाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून आली.
ताब्यात घेतलेल्या इसमांनी आपली नावे

१) अतिक आजम सय्यद, वय ३७ वर्षे, रा. खाटीक गल्ली, अहमदपूर.

२) पदमाकर हाणुमंत कांबळे, वय २८ वर्षे, रा. हंडरगुळी, ता. उदगीर.
(सध्या रा. भोई गल्ली, अहमदपूर)

असे असून सदर आरोपींकडे मिळून आलेल्या मुद्देमालाबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी आठ दिवसांपूर्वी धामनगाव, ता. जळकोट येथे रात्रीच्या वेळी एका घरात घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर जळकोट पोलीस स्टेशनच्या अभिलेखाची पाहणी केली असता, सदर घटनेबाबत गु.र.नं. १८/२०२६ कलम ३३३(३), ३०५(अ) बिएनएस अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले.
                    नमूद आरोपीताकडून सोन्याचे दागिने (मंगळसूत्राचे १३८ मणी व वाटी – एकूण वजन १९.५ ग्रॅम) – ₹ ६०,०००/- रोख रक्कम २०,०००/- एकूण मुद्देमाल : ₹ ८०,०००/- जप्त करण्यात आला असून सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
                सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वातील पथकामधील सपोनि सदानंद भुजबळ, अमितकुमार पुणेकर, पोउपनि प्रमोद देशमुख, पोलीस अमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, रामलिंग शिंदे, प्रदिप स्वामी, श्रीनिवास जांभळे, धनंजय गुट्टे, गोरोबा इंगोले, सुहास जाधव ,पोह राजेश कांचे, 
सायबर सेल येथील शैलेश सुडे, अंजली गायकवाड व हरि पतंगे यांनी केली आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर