लातूर पोलीस दलात अत्याधुनिक सर्व्हेलन्स व्हॅनचा समावेश; कायदा व सुव्यवस्थेला नवे बळ – पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते उद्घाटन


       लातूर, दि. ३(प्रतिनिधी): लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक व प्रभावीपणे राखण्याच्या दृष्टीने लातूर जिल्हा पोलीस दलाच्या तांत्रिक क्षमतेत महत्त्वपूर्ण भर पडली आहे. महाराष्ट्र राज्य अपर पोलीस महासंचालक (कम्युनिकेशन व मोटार ट्रान्सपोर्ट) यांच्या वतीने लातूर पोलीस दलास दोन अत्याधुनिक सर्व्हेलन्स व्हॅन प्राप्त झाल्या असून, त्यांचे उद्घाटन दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.
या अत्याधुनिक सर्व्हेलन्स वाहनांमध्ये सर्व बाजूंनी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे, लाईव्ह मॉनिटरिंग व लाईव्ह स्ट्रीमिंग सिस्टीम, पब्लिक अॅड्रेस सिस्टीम, फ्लड लाईट सुविधा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी विशेष निरीक्षण व्यवस्था उपलब्ध आहे. या वाहनांच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील गस्त, संवेदनशील ठिकाणांवरील नजर, सण-उत्सव, मिरवणुका, सभा, मोर्चे व विविध बंदोबस्ताच्या वेळी प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलीस सेवा अधिक नागरिकाभिमुख व सक्षम करण्याचा संकल्प व्यक्त केला. या उद्घाटन सोहळ्यास अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक (गृह), स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा तसेच मोटार परिवहन विभागाचे अधिकारी व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर