पंचायत समिती गण महाराणा प्रताप नगर अनुसूचित जातीसाठी सौ. शिल्पा बंडू उपाडे यांनी काँग्रेस पक्षाकडे अधिकृत मागणी


       लातूर, दि. १६ (प्रतिनिधी) :  आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराणा प्रताप नगर पंचायत समिती गण अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या गणातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी  अर्ज सादर केला आहे.
सौ. शिल्पा उपाडे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व महिला सबलीकरणाच्या कार्यात सक्रिय असून परिसरातील नागरिकांशी त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क आहे. अनुसूचित जातीतील नागरिकांचे प्रश्न, मूलभूत सुविधा, पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य सेवा, स्वच्छता, महिला व युवांसाठी रोजगाराच्या संधी यांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.
मागणी अर्ज सादर करताना सौ. शिल्पा उपाडे यांनी सांगितले की, महाराणा प्रताप नगर परिसरात विकासकामांसाठी सक्षम व लोकाभिमुख प्रतिनिधित्वाची गरज आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न पंचायत समिती स्तरावर प्रभावीपणे मांडण्याचा आपला संकल्प आहे.
या वेळी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. पक्षाने उमेदवारी दिल्यास मतदारांचा विश्वास सार्थ ठरवून सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सौ. उपाडे यांनी नमूद केले.
पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांनी पक्षांकडे अर्ज सादर करण्यास सुरुवात केली असून, सौ. शिल्पा बंडू उपाडे यांच्या मागणी अर्जामुळे महाराणा प्रताप नगर गणात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर