संघटित चोरी टोळीचा पर्दाफाश, ४ आरोपी अटकेत, ९.२६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

कष्टकरी शेतकऱ्यांना दिलासा : संघटित चोरी टोळीचा पर्दाफाश, चार आरोपी अटकेत
           लातूर, दि. २५ (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात शेतशिवारातील पाणबुडी मोटारी, स्प्रिंकलर सेट, म्हशी तसेच परवाना असलेल्या हॉटेल व बिअर बार फोडून विदेशी दारू चोरी करणाऱ्या संघटित टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 
चार सराईत आरोपींना अटक करून एकूण ९.२६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने मुरुड–अकोला परिसरात सापळा रचून बोलेरो पिकअप वाहनासह चार संशयितांना ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान १० पाणबुडी मोटारी, विदेशी दारूचे २३ बॉक्स, ₹१.५७ लाख रोख रक्कम व बोलेरो पिकअप वाहन असा मुद्देमाल आढळून आला.
चौकशीत आरोपींनी लातूर, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यात गेल्या एक वर्षापासून चोरी केल्याची कबुली दिली. या टोळीशी संबंधित १० गंभीर गुन्हे उघडकीस आले असून आरोपींना पोलीस स्टेशन मुरुड येथे गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी हजर करण्यात आले आहे. फरार साथीदारांचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येणार आहे.
ही कारवाई लातूर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे आणि शेतकरी व व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी घेतलेल्या कठोर भूमिकेचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर