ओबीसी बहुजन आघाडीची कार्यकर्ता संवाद बैठक व पत्रकार परिषद उत्साहात संपन्न

      लातूर, दि. १८ (प्रतिनिधी): ओबीसी बहुजन आघाडीच्या वतीने कार्यकर्ता संवाद बैठक व पत्रकार परिषद रविवारी (दि. १८ जानेवारी २०२६) सायंकाळी लातूर येथील हॉटेल अंजनी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर येथे उत्साहात पार पडली. या बैठकीचा उद्देश संघटनात्मक बळकटी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी ताकतीने उभा राहणार असल्याचेही ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 
         कार्यक्रमाची सुरुवात दावणकर यांनी उपस्थित मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करून केली. यानंतर माजी आमदार मा. प्रकाश (अण्णा) शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी दावणकर लिखित यांच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्मरणिकेत संघटनेची भूमिका, सामाजिक प्रश्नांवरील भूमिका तसेच आगामी काळातील दिशा स्पष्ट करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा. प्रकाश (अण्णा) शेंडगे, महासचिव मा. चंद्रकांत बावकर, खजिनदार मा. जे. डी. तांडेल तसेच राज्य संघटन सचिव मा. पांडुरंग मिरगळ यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ओबीसी, बहुजन समाजाच्या हक्कांसाठी संघटित लढ्याची आवश्यकता अधोरेखित केली.
यावेळी बोलताना शेंडगे म्हणाले की, ओबीसी बहुजन आघाडी एकत्र येऊन समाजासमोरील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांवर सविस्तर भाष्य केले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावपातळीवर जनजागृती वाढवावी, संघटन मजबूत करावे आणि समाजहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडावेत, असे आवाहन करण्यात आले.
पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना नेत्यांनी आगामी राजकीय घडामोडी, संघटनेची भूमिका व भविष्यातील आंदोलनात्मक कार्यक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यासह परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओबीसी बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप सामाजिक एकतेचा संदेश देत करण्यात आला. शेवटी बावकर यांनी उपस्थित पत्रकार व मान्यवरांचे आभार मानले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर