सौ. मनीषा बसपुरे ह्या होतील का लातूरच्या महापौर…?समस्त मातंग समाजाची ठाम मागणी


समस्त मातंग समाजाची माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा आमदार अमितभैय्या विलासरावजी देशमुख यांच्याकडे निवासस्थानी मागणी**
      लातूर, दि. २३(प्रतिनिधी) : लातूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला असतानाच काँग्रेस पक्षाच्या सौ. मनीषा सुनील बसपुरे यांचे नाव महापौर पदासाठी पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर समस्त मातंग समाजाच्या वतीने माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा आमदार अमितभैय्या विलासरावजी देशमुख यांच्याकडे त्यांच्या निवासस्थानी जाऊन सौ. बसपुरे यांना महापौर पदाची संधी द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
यावेळी समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधींनी आमदार अमितभैय्या देशमुख यांच्याशी चर्चा करताना सांगितले की, सौ. मनीषा सुनील बसपुरे या काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान, सामाजिक भान असलेल्या आणि तळागाळातील प्रश्नांसाठी सातत्याने काम करणाऱ्या नेत्या आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महापौरपदाची जबाबदारी दिल्यास शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच सामाजिक समतोलही साधला जाईल.
मातंग समाजाच्या प्रतिनिधींनी पुढे नमूद केले की, महापौर पदावर समाजातील महिलेला संधी मिळणे हे सामाजिक न्याय व प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल. यामुळे वंचित व दुर्लक्षित घटकांचा आवाज महापालिकेत अधिक प्रभावीपणे मांडला जाईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार अमितभैय्या विलासरावजी देशमुख यांनी समाजाच्या भावना समजून घेत मागणी गांभीर्याने ऐकून घेतली. योग्य वेळी पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करून न्याय्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, लातूर महापालिकेतील सत्तास्थापनेनंतर महापौर पदावर कोणाची निवड होणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली असून, सौ. मनीषा सुनील बसपुरे यांच्या नावाची चर्चा अधिक जोर धरू लागली आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर