राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप यांचा बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त सत्कार



      लातूर, दि.६ (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप यांनी आपल्या कार्यकाळातील पहिल्या १०० दिवसांत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता.
या गौरवाच्या पार्श्वभूमीवर आज मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त लातूर येथील जिल्हा माहिती कार्यालयात प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप यांनी प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
यावेळी युवा मुस्लिम विकास परिषदेचे संपादक समद शेख, तसेच ‘नंदादीप वार्ता’चे संपादक खंडेराव देडे  यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास युवा मुस्लिम विकास परिषदेचे संपादक समद शेख, तसेच ‘नंदादीप वार्ता’चे संपादक खंडेराव देडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी तानाजी घोलप यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत, शासनाच्या योजना व निर्णय प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
तानाजी घोलप यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून पत्रकारांशी समन्वय राखत, डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून शासन–प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील संवाद अधिक सशक्त केला. त्यांच्या कार्यामुळे जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाला गतिमानता आली असून, लातूर जिल्ह्याचा नावलौकिक राज्यपातळीवर वाढला आहे.
सत्काराला उत्तर देताना तानाजी घोलप यांनी, “हा सन्मान वैयक्तिक नसून संपूर्ण माहिती विभागाच्या टीमवर्कचा आहे. पुढील काळातही शासनाची माहिती पारदर्शक व प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राहील,” असे मनोगत व्यक्त केले.
बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त झालेला हा सत्कार कार्यक्रम उपस्थित पत्रकार, संपादक व मान्यवरांसाठी प्रेरणादायी ठरला.
   यावेळी अरूण पटवेकर, विभागीय माहिती कार्यालयातील लेखा विभाग प्रमुख मागे साहेब यांची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर