महारक्तदान शिबिराचे आयोजनसहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम


      अहमदपूर दि.४ (प्रतिनिधी) : येथील काकी प्रतिष्ठानच्या वतीने राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ५ डिसेंबर रोजी शिरूर ताजबंद येथील इंदिराणी निवासस्थानी भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

काकी फाउंडेशनच्या वतीने आयोजित या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास ५ लाख रुपयांचा अपघाती विमा देण्यात येणार असल्याची माहिती सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव यांनी दिली. रक्तदानासारख्या पवित्र कार्याला प्रोत्साहन देत दात्यांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेली ही तरतूद सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे.

यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अविनाश जाधव आणि शिरूर ताजबंद ग्रामपंचायतीचे उपसरपंच सूरज पाटील यांनी सांगितले की, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या सामाजिक कार्याला सलाम म्हणून हे शिबिर आयोजित केले असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे.

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या कार्याशी प्रेरित होऊन अनेक युवक, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक शिबिरात सहभागी होणार आहेत. रक्तदानामुळे अनेकांना नवीन जीवन मिळते, म्हणून हा उपक्रम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे आयोजकांनी सांगितले.

शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र, अल्पोपहार आणि आरोग्य तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात राबविण्यात येणारा हा उपक्रम सामाजिक ऐक्य, आरोग्य जागरूकता आणि सहकारभावना दृढ करणारा ठरणार आहे.

सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव व उपसरपंच सूरज पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले की, “एक यूनिट रक्त अनेकांचे प्राण वाचवू शकते, म्हणून प्रत्येकाने पुढे येऊन रक्तदान करून सहकारमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधावे.”

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर