लक्ष्मी अर्बन को-ऑप.बँकेत दिनदर्शिकेचे प्रकाशन



     लातूर, दि. १(प्रतिनिधी) :  मराठवाड्यातील अग्रगण्य लक्ष्मी अर्बन को-ऑप.बँक लि, लातूरच्या वतीने काढण्यात आलेल्या आगामी २०२६ या नूतनवर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शुक्रवार दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी बँकेच्या कव्हा रोड, लातूर येथील मुख्य कार्यालयात करण्यात आले. 

दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रम *बँकेचे चेअरमन अशोकजी अग्रवाल* यांच्या अध्यक्षतेखाली  व 
विशेष अतिथी म्हणून पत्रकार  *शशिकांतजी पाटील* न्युज १८ लोकमत व आकाशवाणी  लातूर जिल्हा रिपोर्टर, *राजेंद्रजी खराडे* उपसंपादक दै. पुण्य नगरी व *दिपरत्नजी निलंगेकर* (संपादक युतीचक्र व दुरदर्शन जिल्हा प्रतिनिधी)  यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 
*बँकेचे चेअरमन अशोकजी अग्रवाल यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रिंट मिडिया, डिजीटल मिडियाच्या माध्यमातून बँकेच्या योजना ग्राहकांपर्यंत पोहचवण्यास*
*पत्रकार बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभत आले आहे, असे मत व्यक्त केले.*

*पत्रकार शशिकांतजी पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना बँकेच्या उत्तुंग  यशाबद्दल बँकेच्या संचालक मंडळाचे अभिनंदन केले.*
 *लातूर जिल्ह्यातील पहिली डिजीटल बँकिंग सुविधा पुरवणारी अधुनिक बँक म्हणुन बँकेचा नावलौकिक आहे.* दिनदर्शिका च्या माध्यमातून बँकेच्या योजना, पंचांग व दिनविशेष ग्राहकांना पाहता येईल, असे मत व्यक्त केले. 
     यावेळी बँकेचे व्हा.चेअरमन सतिशजी भोसले, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांतजी सोमाणी, जेष्ठ पत्रकार तथा संचालक सूर्यप्रकाशजी धुत, संचालक अजितलालजी आळंदकर, शशिकांतजी मोरलावार, गणेशची हेडडा, आशिषजी अग्रवाल,सौ.कमलादेवी राठी, सौ. माला भुतडा,
मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाशजी आळंदकर, वरिष्ठ अधिकारी सुशिल जोशी व कर्मचारी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिकारी सुशिल जोशी यांनी केले व व्हा. चेअरमन सतिशजी भोसले यांनी आभार मानले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर