दीर्घकालीन पक्षनिष्ठा आणि सक्रिय कार्याचा मान – गणेश देशमुख यांची भाजप उमेदवारीसाठी अधिकृत मागणी
लातूर, दि. ६ (प्रतिनिधी) : आगामी लातूर महानगरपालिका निवडणूक 2025-26 चा राजकीय माहोल तापू लागला असून विविध प्रभागांतून उमेदवारीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे. लातूर शहर प्रभाग क्रमांक 16 (सर्वसाधारण पुरुष) मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान आणि सक्रिय पदाधिकारी श्री गणेश व्यंकटराव देशमुख बाभळगावकर यांनी आज अधिकृतरित्या पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणारा परिचय अर्ज सादर केला.
श्री. देशमुख हे अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक 16 चे रहिवासी असून पक्षाच्या संघटनात त्यांनी बुथ प्रमुख म्हणून सातत्यपूर्ण कार्य केले आहे. लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ अशा अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून पक्षाच्या विजयासाठी मोठे योगदान दिले आहे. या दीर्घकाळाच्या सेवेला आणि कार्यकाळातील निष्ठेला मान्यता देत छत्रपती शिवाजी महाराज मंडळ अध्यक्ष यांच्या शिफारशीनंतर त्यांनी अधिकृत उमेदवारीची मागणी केली आहे.
आज लातूर शहर भाजप कार्यालयात श्री. देशमुख यांनी आपला परिचय अर्ज उमेदवारी अर्ज स्वीकार समिती समोर सादर केला. यावेळी समितीच्या सौ. मिनाताई भोसले, शिवसिंह सिसोदिया, रविजी सुडे, सरचिटणीस संजय गिर, निखिल गायकवाड यांनी अर्ज स्विकारला.
या कार्यक्रमाला प्रभागातील प्रमुख मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. त्यामध्ये प्रा. उदयजी देशपांडे, जेष्ठ नेते दिलीप जाधवमामा, मधूसूदन पारिख, अॅड. किशीरजी शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर श्री. गणेश देशमुख यांनी पक्ष नेतृत्वाला विश्वास देत सांगितले की,
“पक्षाने मला नेतृत्वाची संधी दिल्यास, प्रभागातील सर्वांना सोबत घेऊन आगामी मनपा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला निश्चित विजयी करुन दाखवीन. पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते मला ही संधी देतील, असा पूर्ण आत्मविश्वास मला आहे.”
प्रभागात गेल्या अनेक वर्षांपासून सतत कार्यरत राहिल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्या नावाची चर्चाही वाढू लागली आहे. पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीवर अंतिम निर्णय होण्याची उत्सुकता आता प्रभागात पाहायला मिळत आहे.
आगामी काही दिवसांत मनपा निवडणुकीची तयारी अधिक वेग घेणार असून भाजपच्या उमेदवार निवडीसाठी हा अर्ज महत्वाचा टप्पा मानला जात आहे.