लातूर शहर महानगरपालिका लातूर
प्रति,
मा. आयुक्त/ उपायुक्त साहेब,लातूर शहर महानगरपालिका लातूर.
विषय:- ई-निविदा, व निवडणूक विभाग जाहीरात प्रगटन, पाणी पुरवठा विभाग यांनी वृत्तपत्रांना १२० चौरस सेंटीमीटर जाहिरात देण्याऐवजी ४००० चौसेंमीची जाहिरात निविदा प्रसिद्धीस दिल्याबाबत....
महोदय,
वरील विषयी विनंतीपूर्वक अर्ज करतो की मी लातूर शहर महानगर पालिकेने 2023 मध्ये ठराव घेऊन 54 चौरस मीटर जाहिराती देण्याचा ठराव करण्यात आला होता त्याऐवजी 120 देण्यात यावा असा ठराव करण्यात आला होता. परंतु पाणीपुरवठा विभाग व निवडणूक विभाग यांनी वर करताना देण्यात आलेल्या जाहीर प्रगटन प्रसिद्धीसाठी 120 चौरस जाहिरात येऊन ४००० चौरस मीटर देण्यात आली आहे त्याची देयक दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजी आदा करण्यात आले आहे. तसेच 58 हजार रुपये अदा करण्यात आले आहे. एका एका वृत्तपत्रांना ८० हजार दोनशे रुपये देण्यात आले आहे. पाणीपुरवठा विभाग व निवडणूक विभाग या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिले तयार करून अकाउंट विभागात पाठविले असून ते वित्त विभागाकडून तपासणी करण्यात आले असून आणि ते देयक आदा करण्यात आले आहे फक्त १२० चौरस मीटर जाहिरात देण्यात येते, असे असताना देखील जास्तीत जास्त चौसेमी जाहिरात देण्यात आली आहे.
वरील अधिकारी कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा करून तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा दहा दिवसाच्या उपोषणात बसण्यात येईल.
तरी माननीय साहेबांना विनंती की वरील संदर्भात तात्काळ दखल घेऊन अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावी ही विनंती.
आपला,
पत्रकार
याची एक प्रत माहितीस्तव सादर.....
१) माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई
२) माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई.
३) माननीय माहिती व जनसंपर्क महासंचालक जाहिराती विभाग मंत्रालय मुंबई क्रमांक 32.
४) माननीय जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी परिसर लातूर.
५) माननीय आयुक्त मॅडम लातूर शहर महानगरपालिका लातूर