मागण्या मान्य नाही झाल्या तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आम्हाला दिलेला पुरस्कार परत करू, असा इशारा- अँड. वैजनाथराव वाघमारे यांचे प्रतिपादन

            लातूर, दि. ९ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सर्व पुरस्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहिर डॉ.अण्णा भाऊ साठे पुरस्कार, संत रोहिदास महाराज पुरस्कार, मुंदडा आदिवासी पुरस्कार इत्यादी सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींना वृद्धापकाळात पुढील उर्वरीत आयुष्य सुसह्य जगण्यासाठी महाराष्ट्र शासना मार्फत स्वातंत्र्य सैनीकांप्रमाणे दरमहा १५,००० रुपये पेन्शन (मानधन) देण्यात यावी, पुरस्कार प्राप्त व्यक्ती मृत पावल्यास ति पेन्शन त्याच्या वारस पत्नीस मिळावी,
पुरस्कार प्राप्त व्यक्ती व सोबती यांना एसटी महामंडळाच्या सर्व आराम, निमआराम, शिवशाही, ई-शिवनेरी, शिवाई, स्लिपरकोच, इलेक्ट्रॉनिक बस, अशा सर्वंच बसमधुन मोफत प्रवास सुविधा देण्यात यावी., विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून मान्यता देण्यात यावी तसेच मंत्रालयामध्ये तात्काळ प्रवेश देण्यात यावा. आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आम्हाला दिलेला पुरस्कार परत करू, असा इशारा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त महासंघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष अँड.वैजनाथजी वाघमारे लातूर येथे आयोजित पत्रकार परिषद बोलताना दिली. वाघमारे
 यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता यशवंत स्टेडियम टि पॉईंट नागपुर विधान भवनापर्यंत हिवाळी अधिवेशनात मोर्चा निघणार आहे. महाराष्ट्रातील सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आपल्या मागण्या मंजुर करण्यासाठी नागपुर येथे मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर येथील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त महासंघाचे ्संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड. वैजनाथजी वाघमारे व राज्य अध्यक्ष नामदेवराव चांदणे, शेषेराव करखेलीकर, लक्ष्मणराव तिकटे, शामराव सूर्यवंशी, अड.अंगद गायकवाड, प्रभुदास तायडे, केशव कांबळे, भुजंग कांबळे, डॉ. व्यंकटराव शिंदे आदींची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर