प्रति बाबासाहेब मनोहरे बनण्याचा उपायुक्त पंजाब खानसोळे यांचा प्रयत्न
कामापेक्षा प्रसिद्धी स्टंटच जास्त
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त पंजाब खानसोळे यांच्याकडून कामापेक्षा प्रसिद्धी स्टंट जास्त प्रमाणात केला जात असल्यामुळे महानगरपालिकेचे आयुक्त मानसी मीना आहेत की उपयुक्त पंजाब खासोळे हेच सर्वसामान्य लातूरकरांना समजून येत नाही.
तर पंजाब खानसोळे यांच्याकडून तत्कालीन आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या कार्यपद्धतीची री ओढण्याचा प्रयत्न केला जात असून यातून ते स्वतःला प्रति बाबासाहेब मनोहरे समजायला लागले आहेत. शासनाकडून त्यांच्या या प्रसिद्धीच्या कार्यपद्धतीवर वेळीच नियंत्रण घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
लातूर शहर महानगरपालिकेमध्ये गेल्या सात वर्षांपासून प्रशासक राज आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्याची मुदत संपल्यानंतर, पहिल्यांदा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पदभार स्वीकारला. आणि त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये गेल्या अनेक वर्षापासून, महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलामध्ये प्रस्थापित व्यापाऱ्याकडून कमी भाड्यामध्ये अनेक वर्ष राहून फायदा लाटला जात होता. त्यांची नैसर्गिक भाडेवाढ अपेक्षित असताना प्रशासनाकडून कोणताही भाडेवाढ राबविली नाही. त्यामुळे त्यांनी शहरातील गंजगोलाई, गांधी मैदान, गांधी मैदान दोन, यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्स, भाजी मार्केट, स्क्रॅप मार्केट येथील गळ्यांची भाडेवाडीचा प्रयत्न केला. परंतु राजकारणातील बड्या माशांच्या हस्तक्षेपामुळे व्यापाऱ्यांच्या भाडेवाडीचा तो प्रयत्न थांबवण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी, प्रभारी आयुक्त जी श्रीकांत राजकारण्यांच्या दबावाला बळी पडले की मोठी आर्थिक सेटलमेंट केली. याबाबत सर्वसामान्य नागरिकांतून तर्कवितर्क अजूनही लढवले जात आहेत. त्यानंतर 20 ऑक्टोबर 2022 रोजी बाबासाहेब मनोहरे हे पूर्णवेळ आयुक्त म्हणून कार्यरत झाले. बाबासाहेब मनोहरे यांना लातूर शहर महानगरपालिका आर्थिक डबघाईला आल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांच्या पगारीलाही पैसा या महानगरपालिकेत नाही. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये प्रथमच थकीत मालमत्ता धारकांच्या कर संकलनासाठी मोठे प्रयत्न केले. आणि त्यातून त्यांनी थकीत मालमत्ता धारकांच्या कर संकलनासाठी विविध योजना कार्यरत करून, वसुली मोठ्या प्रमाणात करून घेतली. महानगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये कामकाजासाठी शिस्त निर्माण केली. हे करत असताना त्यांनी प्रसिद्धीसाठी कोणतीही स्टंटबाजी केली नाही. त्यानंतर बाबासाहेब मनोहरे यांच्या बाबतीत आपत्कालीन घटना घडली. त्यांच्या जागी देविदास जाधव हे प्रभारी आयुक्त म्हणून कामकाजाला सुरुवात केली. मात्र देविदास जाधव यांचा कार्यकाल कमी कालावधीचा राहिला. दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेब मनोहरे यांच्यानंतर उपायुक्त म्हणून कार्य करत असलेले पंजाब खानसोळे हे अनुभवी असल्यामुळे आणि देविदास जाधव हे नवखे असल्यामुळे, त्यांनी लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार आपल्या हाती घेतला. आणि त्यानंतर पंजाब खानसोळे यांच्याकडून बाबासाहेब मनोहरे यांच्या कार्याची री पुढे ओढण्याचे कार्य केले जाऊ लागले . परंतु हे करत असताना उपयुक्त पंजाब खानसोळे यांनी काम कमी आणि प्रसिद्धी स्टंट जास्त ही पद्धती अवलंबली. यातून त्यांना बाबासाहेब मनोहरे यांच्यानंतर लातूर शहर महानगरपालिकेचा मीच कर्तव्यदक्ष आयुक्त असा सर्वसामान्य नागरिकांना दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि अजूनही होत आहे. या मध्यंतरीच्या काळामध्ये तत्कालीन सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांनी वसुलीच्या कामकाजामध्ये मोठे कार्य केले. मात्र त्यांच्याकडून यासाठी कोणत्याही प्रसिद्धीचा स्टंट अवलंबला नाही. जास्तीची स्टंटबाजी केली नाही. परंतु पंजाब खानसोळे उपायुक्त असूनही शहरातील स्वच्छता, कर संकलन, प्रशासकीय कामकाज, हाताळण्याचे काम करत होते. परंतु त्यांच्याकडून काम कमी आणि प्रसिद्धी स्टंट जास्त ही नवीन पद्धती अवलंबली जात होती. त्यामुळे लातूरकरांना उपयुक्त पंजाब खानसोळे हे अधिकारी आहेत की निवडून आलेले पदाधिकारी हेच समजून येत नव्हते. कोणत्याही कार्यालयातील अधिकारी शासनाने प्रशासनाने त्यांना नेमून दिलेले काम करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे. हे करत असताना त्यांच्याकडून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या स्टंटबाजीची प्रसिद्धीची अपेक्षा नसते. कारण ते नवनियुक्त पदाधिकारी नाहीत. ते कार्यालयाचे जबाबदार अधिकारी असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कार्याची, अडचणीची सोडवणूक करणे हे त्यांचे कामच आहे. 2025 मध्ये आयुक्त म्हणून मानसी मीना यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर आयुक्त मानसी मीना यांच्याकडून मोठ्या कार्याची अपेक्षा असताना. त्यांच्याकडून कोणतीही भरीव कार्य अद्याप झाले नाही. जी अतिक्रमण राबवली गेली ती अर्धवटच सोडण्यात आली. उलट त्या जागेवर पुन्हा अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्येही उपायुक्त पंजाब खानसोळे यांचा पुढाकार असल्याचे दाखवत प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करण्यात आली. यानंतर मानसी मीना या महिला असल्यामुळे प्रशासकीय कामकाज वगळता शहरातील कामकाजावर त्यांच्या मर्यादा येत असल्यामुळे, मानसी मीना या पदभार स्वीकारण्याआधी उपयुक्त पंजाब हानसोळे हे कार्यरत असल्यामुळे, आयुक्त मानसी मीना यांच्यासमोर पंजाब खानसोळे यांनी मला संपूर्ण लातूर शहराची माहिती आहे, कोणत्या प्रभागामध्ये कोणत्या अडचणी आहेत. याची मला संपूर्ण खडां न खडा माहिती आहे. अशी प्रतिमा निर्माण करून ठेवली. आणि आयुक्त नावाला, आणि कामकाज भावाला. अशी परिस्थिती पंजाब खानसोळे यांनी करून ठेवली. हे काम करत असताना पंजाब खानसोळे यांनी काम कमी आणि प्रसिद्धीचा स्टंट मोठा ही पद्धती अवलंबल्यामुळे, शहरातील नागरिकांमध्ये आयुक्त मानसी मीना या नावापुरत्या आयुक्त असून, सर्व कामकाज उपायुक्त पंजाब खाजोळे हेच पाहतात. अशी विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्धी स्टंट अवलंबल्यामुळे उपयुक्त हेच आयुक्त अशी धारणा लातूरकरामध्ये झाली. पंजाब खनसोळे यांनी आपल्या प्रसिद्धीसाठी, शहरातील छोट्या-मोठ्या युट्युब स्टार्सला हाताशी धरून, आयुक्त मानसी मीना यांना बाजूला ठेवून, महानगरपालिकेच्या कामकाजाची माहिती देणे, या कामकाजामध्ये आपण कसे सहभागी आहोत याचा प्रयत्न करणे, कार्यालयीन कामकाजाच्या फोटोमध्ये आपण अग्रभागी आहोत हे दाखवणे, शहरातील सार्वजनिक जयंती, महोत्सवामध्ये सहभाग दाखवणे अशी पद्धती अवलंबल्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेचा आयुक्त मीच अशी कार्यपद्धती चालवल्यामुळे पंजाब खानसुळे हे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत की प्रसिद्धी प्रमुख हेच लातूरकरांना कळून येत नाही. सध्या लातूर महानगरपालिकेमध्ये प्रशासक असल्यामुळे त्यांना जाब विचारणारा कोणी नाही. ते करतील ते पूर्व दिशा अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पंजाब खानसोळे याचा पुरेपूर फायदा उठवत आहेत. त्यांच्याकडून काम कमी आणि प्रसिद्धी जास्त अशी पद्धती अवलंबली जात आहे. अशा काम कमी आणि प्रसिद्धीसाठी पुढाकार घेणाऱ्या अधिकाऱ्यांची लातूर शहर महानगरपालिकेतून तात्काळ बदली करावी अशी मागणी लातूरकरांनी शासनाकडे केली आहे.