समाजहित, नैतिकता आणि प्रामाणिकता या मूल्यांचा वापर करावा : राज्यपाल हरिभाऊ बागडे


     पंढरपूर दि. १६ (प्रतिनिधी) : व्हाईस ऑफ मीडिया आणि व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम, महाराष्ट्र – भारत यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे आयोजित राज्यस्तरीय शिखर अधिवेशनात कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने सुरूवात झाली. यावेळी राज्यस्थानचे महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा सत्कार शाल व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

    आपल्या प्रभावी शब्दांत पत्रकारितेची जबाबदारी अधोरेखित केली. समाजहित, नैतिकता आणि प्रामाणिकता या मूल्यांचा पुनरुच्चार करीत त्यांनी उपस्थित पत्रकार, संपादक, माध्यम प्रतिनिधी यांना मार्गदर्शनपर संदेश दिला.

  स्वागताध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता मा.राणा सूर्यवंशी, प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के, संदीप काळे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष मुंबई, दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. तसेच, राज्यभरातून संपादक, पत्रकार, इलेक्ट्रिनिक मीडियाचे प्रतीनिधी मोठ्या संख्येने उपस्थित ह़ोते.

    पुढे  बोलताना महामहीम म्हणाले की, “पत्रकार हा समाजातील नारदमुनीचे काम करतो. सत्य बातमी, वस्तुनिष्ठता आणि जनतेपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याची महत्त्वाची भूमिका पत्रकार निभावत असतो.” पत्रकारितेचा इतिहास सांगताना त्यांनी सन ११९३ मध्ये खिलजी सेनापतीने नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त केलेल्या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख करून माहिती प्रसाराचे महत्त्व अधोरेखित केले. ज्ञानाचा प्रसार थांबला की समाज मागे जातो, हे त्यांनी या उदाहरणातून स्पष्ट केले.

पत्रकारिता ही केवळ नोकरी किंवा व्यवसाय नसून समाजासाठी मोठी देणगी देण्याची संधी आहे, असे सांगताना त्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. “आपल्याला विचारांचे आणि लेखनाचे स्वातंत्र्य आहे, पण त्याचा गैरफायदा घेऊ नये. समाजाचे भान आणि नैतिक चौकट कायम ठेवून काम करणे हीच खरी पत्रकारिता,” असे ते म्हणाले.

राज्यभरातून आलेल्या पत्रकारांचे प्रबोधन करताना त्यांनी
– सत्यनिष्ठ वृत्तांकन,
– संवेदनशीलतेने बातम्या मांडणे,
– समाजिक ऐक्याची जपणूक,
– आणि लोकशाही बळकट करण्यासाठी माध्यमांची भूमिका
यावर प्रकाश टाकला.

या शिखर अधिवेशनात विविध माध्यम क्षेत्रातील मान्यवर, संपादक, पत्रकार, तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले.

पंढरपूरमध्ये पार पडलेल्या या अधिवेशनात पत्रकारितेचे मूल्य, समाजातील माध्यमांची भूमिका आणि जबाबदार लेखन या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण विचारमंथन झाले. महामहीम राज्यपालांच्या मार्गदर्शनपर भाषणाने उपस्थितांना प्रेरणादायी दिशा दिली.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर