श्री. संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात


बॉयलर अग्नी प्रदीपन, गणपती पूजन व नव्या हार्वेस्टर पूजेनं सुरुवात

      बेलकुंड, दि. ५ (प्रतिनिधी) : ता.औसा येथील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी मंगलमय वातावरणात करण्यात आला. बॉयलर अग्नी प्रदीपन व गणेश पूजनाने या हंगामाचा प्रारंभ झाला. या शुभारंभ प्रसंगी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माकणीखर, देवतळा संस्थानचे प्रमुख महंत राजेंद्र गिरी महाराज, ऊस दर नियमन समितीचे सदस्य धनंजय भोसलें, चेअरमन श्याम भोसलें यांची प्रमुख उपस्थिती होती.

या गळीत हंगामाच्या प्रारंभानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 

या कार्यक्रमास कारखान्याचे गणपतराव बाजुळगे, सुभाष जाधव, अंड. बाबासाहेब गायकवाड, भारत माळी (फुलसुंदर), संदीप भोसेले, अमित माने, रमेश वळके, अनिल पाटील, विलास काळे, गोविंद सोनटक्के, चंद्रसेन पाटील, कार्यकारी संचालक सदाशिव बहीर, शेतकरी संघटनेचे राजीव कसबे, राजेंद्र मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शुभारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष थोरात यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन कारखान्याचे जनरल मॅनेजर गणेश येवले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. शुभारंभ प्रसंगी मांजरा शुगरचे जी.एम. वाकडे, शेतकी अधिकारी कदम, चीफ इंजिनियर सुनील पवार, चीफ केमिस्ट नानासाहेब पाटोळे, चीफ ऑडिटर गोपाळ चव्हाण, सिव्हिल इंजिनियर पी.डी. काळे, तसेच कारखान्याचे अधिकारी सूर्यकांत सावंत आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पाच गटातील उस उत्पादक प्रतिनिधी समारंभात सहभागी झाले होते. राजेंद्र मोरे, शिवाजी सातव, सोहनलाल वर्मा, महमद बिरादार, अतुल बळवंतराव पाटील आदींची उपस्थिती लक्षणीय होती. पारंपरिक पद्धतीने बॉयलर होमहवनपूजन संचालक संतोष जनार्दन भोसले यांच्या हस्ते सपत्नीक तसेच गव्हाणपूजन व सत्यनारायण संचालक शामराव निवृत्ती साळुंखे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले.

या कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. श्रद्धा, भक्ती आणि सहकार्याच्या वातावरणात या वर्षीचा गळीत हंगाम उत्साहात सुरू झाला असून, कारखान्याच्या प्रगतीचा नवा अध्याय यानिमित्ताने लिहिला जाणार आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर