काँग्रेसचे माजी महापौर विक्रांतभैय्या गोजमगुंडे यांचा राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात प्रवेश
जनसामान्यांच्या विश्वासातून उभे राहिलेले नेते; पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा
लातूर, दि. २६ (प्रतिनिधी) : स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर जनसामान्यांच्या मनात अधिराज्य गाजवणारे, लातूरकरांच्या मनातील अत्यंत लोकप्रिय आणि सर्वांचे लाडके नेते काँग्रेसचे माजी महापौर विक्रांत भैय्या गोजमगुंडे यांनी दि. २५ नोव्हेंबर औपचारिकरित्या माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP – Ajit Pawar) मध्ये प्रवेश केला. मुंबई येथे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. लातूरच्या स्थानिक राजकारणात कळब उडाली आहे. विक्रांत गोजमगुंडे दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यांनी स्थायी समितीचे सभापती पद प्रभाग सभापती परिवहन समितीचे सभापती आणि लातूरचे महापौर पद यशस्वीरित्या भूषविली आहे त्यांनी 2008 पासून सक्रिय राजकारणात असलेल्या लातूर युवक काँग्रेसचे अध्यक्षपदी सांभाळले होते काँग्रेसमध्ये नाराज असल्याचे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती आणि ते पक्ष सोडणार असल्याची अटकळ बांधली जात होती.
विक्रांत गोजमगुंडे यांचा राजकीय प्रवास नेहमीच लोकाभिमुख राहिला आहे. महापौर पदापासून विविध सामाजिक कामांपर्यंत त्यांनी सातत्याने लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सरलता, कार्यातील पारदर्शकता आणि सर्वसमावेशक नेतृत्वशैलीमुळे ते लातूरकरांच्या हृदयात विशेष स्थान मिळवून आहेत.
गेल्या काही काळापासून विविध राजकीय घडामोडींमुळे त्यांचा पुढील मार्ग कोणत्या दिशेने जाईल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर आज त्यांनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रवेशानंतर लातूरमधील राजकारणात नवा उर्जा संचार झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर उमटताना दिसत आहे.
या प्रसंगी विक्रांत भैय्या गोजमगुंडे यांनी सांगितले की, “जनतेच्या विकासासाठी ठोस निर्णय घेणारे, कामाला प्राधान्य देणारे आणि स्थिर नेतृत्व देणारे अजितदादा पवार यांच्या कार्यपद्धतीवर माझा पूर्ण विश्वास आहे. लातूरच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी मी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.”
पक्षात गोजमगुंडे यांच्या आगमनामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनाला नक्कीच बळ मिळणार आहे, असे मत पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केले.
लातूर शहर व ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत भैय्यासाहेबांना शुभेच्छांचा वर्षाव केला. विक्रांत भैय्या गोजमगुंडे यांच्या प्रवेशामुळे लातूरच्या राजकीय समीकरणात महत्वाचे बदल घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काँग्रेसच्या कोणत्याही नेतृत्वाबद्दल माझी नाराजी नाही, अशी स्पष्टीकरण त्यांनी शेवटी दिले.
विक्रांत भैय्या गोजमगुंडे यांच्या पुढील राजकीय वाटचालीस लाख लाख शुभेच्छा — अशी प्रतिक्रिया सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.