चित्रपट "वचन आईचं"च्या पोस्टर प्रकाशन सोहळा मान्यवरांची उपस्थितीत संपन्न
*मातृत्वाचे, नात्यांचे संवेदनशील दर्शन घडवणारा* *ठरेल : माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे*
लातूर, दि.२ (प्रतिनिधी) : हॅलो सितारे फिल्मस प्रोडक्शन निर्मित "वचन आईचं" या मराठी चित्रपटाच्या पोस्टर प्रकाशनाचा भव्य सोहळा
लातूर महानगरपालिकाचे माजी महापौर विक्रांतभैय्या गोजमगुंडे, महाराष्ट्र राज्य नाट्य परिषदेचे लातूर शहराध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, दिग्दर्शक मिलिंदजी धनेगावकरसह त्यांच्या पत्नी संध्याताई धनेगावकर आदी मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी दीपप्रज्वलनाने व नटराज पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
चित्रपटाच्या निर्मितीमागील माहिती प्रमुख पाहुणे विक्रांत गोजमगुंडे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी कलाकारांचा सत्कार व कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांचे अभिनंदन करत चित्रपट समाजमनावर परिणाम करणारा आणि मातृत्वाचे, नात्यांचे संवेदनशील दर्शन घडवणारा ठरेल, असा विश्वास गोजमगुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमात संघटकांच्या वतीने प्रमुख अतिथींचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर सामाजिक, सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले.
"वचन आईचं" हा चित्रपट आईच्या त्याग, प्रेम आणि तिच्या निस्वार्थ सेवाभावावर आधारित असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली. ग्रामीण तसेच शहरी पार्श्वभूमीवर साकारलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, समाजात मातृत्वाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा हेतू यातून साधला जाणार आहे. शेवटी चंद्रशेखर मोठे सर यांनी अतिशय सुंदर असे सुत्र संचालन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.